Sunday, September 24, 2006

कसं असतं आजारपण?

(नसलेल्या) डोक्याची जड होण्याची जाणीव. सूर्याने डोळ्यांची जागा घेतली की काय असे वाटायला लावणारा दाह, हातापायांचे अस्तित्व हे कामचुकार मुलांसारखे. लाड करून घ्यायला तयार, पण काम सांगितले की स्वत:ला पुढे उचलायला संपूर्ण नकार. हळुहळू चहाचा घोट व (गरम) पाण्याचा घोट सारखाच वाटतो. स्वयंपाकाचा सुगंध आसमंतात दरवळूनही पोटावर त्याचा परिणाम होत नाही.
अचानक vibrating table सारखे शरीर उडायला लागते. आत नीट ठेवलेली blankets घाइघाईने काढल्या जातात ती शरीराबरोबर थाडथाड उडण्यासाठी. हळुहळू हिही थरथर नाहिशी होते वादळापूर्वीच्या शांततेसारखी. लवकरच कान हे स्वत:चे नसून किटलीचे आहेत हे जाणवायला लागते त्यातून निघणार्या वाफ़ांमुळे. अंगाची भट्टी पेटायला लागते. थर्मामिटरशी दोस्ती होते आणि ती वाढतच जाते. डॉक्टरशी जवळचे नाते निर्माण होतं. हॉस्पिटल व पलंग आपले वाटायला लागतात. अन्नावरची वासना उडताच सर्वं प्रकारचे पदार्थ सेवेशी हजर होतात. पण कडू गोळी, capsules, व ईंजेक्शन हेच काय ते खरे साथीदार बनतात. ceilingकडे बघणे, पंख्याशी संवाद मनातून करणे, हे नित्याचे छंद होतात. घड्याळ फ़ार हळू चालतय असं वाटतं. stereo चे सूर बेसूर होतात, ग्लानी आणि झोप, खाणे आणि गिळणे, बघणे आणि डोळे उघडॆ ठेवणे, यातील फ़रक नाहीसा होतो.
आणि अचानक कायापालट होतो. दरदरून घामाची अंघोळ होते. शब्दं फ़ुटतात ओठातून व कधी एकदा अंघोळ करून हे आजारपणाचे सुतक काढून टाकतो असे होते. बरं वाटल्यानंतर , मला बरं वाटत नव्हतं, ह्यामुळे बरं नं वाटायची काहीच गरज उरत नाही.


हेमंत_सूरत

4 comments:

Gayatri said...

काय तंतोतंत वर्णन आहे, काका! ..पण तुमचे तब्येत ठीक आहे ना? की 'नुकताच घेतलेला स्वानुभव' आहे हा?

आणि शेवटच्या वाक्याचा अर्थ मला कळला नाही नीट..

hemant_surat said...

thanks for compliments! हे जे तंतोतंत वर्णन लिहीलय ते माझ्या कॉलेज ड्रामा पार्टीमधे वाचून दाखविलेले पहिले अपत्य (my first brain-child) आहे. एप्रिल १९७६, होय, सुमारे ३० वर्षांपूर्वीचे आहे.जर ते तुला आजही आवडले असेल तर त्याला (pun) अक्षर वांग्मय (हे मराठीत ह्या fontवर कसे लिहायचे ते तूच सांग) म्हणावे लागेल.
pun apart, हे मला जेव्हा डिप्थेरिआ झाला होता (B.E.final ला) तेव्हाच्या स्वानुभवावरून घेतले आहे. आपुले मरण पाहीले म्या डोळा अशी अवस्था होति. (adult age मध्ये डिप्थेरिआ म्हणजे अर्धे तिकीट काढण्यासारखे!)
हां, आता जिवंत राहून फ़ारसं काय मिळवलं विचारशील तर काही नाही. पण मी म्हणू शकतो की माझ्या मरणातूनच एक लेखक/कवी जन्माला आला.
शेवटची ओळ म्हणजे बरं नसलेलं आपण किती सहज विसरतो यावर आहे.

हेमंत_सूरत

ashley said...
This comment has been removed by the author.
ashley said...

Oh thank you sir for ur comment!

Nice !

i expect ur comment to most of poems/charolis!

mala jya kavita4olis touchy vatlya tynach mazya blog var entry dili ahe

ajun pudhe mirza galib,gulzar,javed akhatar che payam taken...pan arthat jasa vel milel tasa!

ajun ek mhnje tumhi snagitlele Links che samzale ani kele sudhaa ani zale!

tar links madhe "Maza Blog Tagged "
vacha to personal blog ahe na to tagged zala teva me blogmadhe navin hote evdhe lakshadila nahi
check it out

keep in touch!
Cheers
Ashwini