मित्रहो, कवि अनिल ह्यांच्या काही दशपदी माझ्याकडे आहेत. त्यातील काही पाठवतोय. त्यांची CD पण आहे. ती ऎकताना वेगळीच अनुभूती होते. मी माझ्या काही मित्रांना CD पाठवणार आहे gift म्हणून. ज्यांना वेगळी CD हवी आहे त्यांनी ह्या पत्त्यावर संपर्क करावा. अर्थात हा काही publicity stunt नाहीय. फ़क्त बर्याच वेळेस असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते पण कशी व कुठून घ्यावी हे माहीत नसते म्हणून ही सोय केली आहे.
सौ. आशावती देशपांडे, 88, west park road, Dhantoli Nagpur - 440012
एका CD ची किंमत आहे रुपये शंभर . पोस्टेज वेगळे. D.D. १०० रु.ची "सौ. आशावती देशपांडे " ह्या नावाने पाठविणे.
e-mail : deshpande.nagpur@gmail.com
तुझ्याविना
कितीक काळ हालला
असा - तुझ्याविना
कळे न श्वास चालला
कसा तुझ्याविना
दहिवरल्या प्रहरातून वाट
पाहते पहाट
बहर गळे दरवळला
कसा तुझ्याविना
लवथवत्या पानावर गहिवरते
भरदुपार
ज्वरभरला दिवस ढळे
कसा तुझ्याविना
तमामधुन सावकाश उजळे
आकाश निळे
चळे उदास चंद्रमा
कसा तुझ्याविना
तार्यांचा धरून भार रात्रिस
उरते न त्राण
स्मरणावर प्राण जळे
कसा तुझ्याविना
स्वप्नबीज
थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज
काही द्न्यात काही भ्रांत
किंचित व्याकुळ
किंचित शांत
थोडी बाहेर थोडी आत
किंचित पहाट किंचित रात
थोडी ऊब थोडे गार
केव्हा स्मित केव्हा सुस्कार
काही धीट काही भीत
थोडी हार थोडी जीत
अंमळ रुसवा अंमळ प्रीत
काही गुणगुण काही गीत
थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज
4 comments:
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव गोवा
कवी अनिल यांच्या कवितांच्या आनंदात मन डुंबून गेले. त्यांच्या काही कविता अभ्यासात होत्या.
माझाही ब्लॉग आहे. कृपया पाहावा.
prakashkshirsagar.blogspot.com
पेर्ते व्हा पेर्ते व्हा !
धन्यवाद
काका, cd मिळाली. धन्यवाद!
काही कविता स्वरबद्ध स्वरूपात श्रवणीय वाटल्या पण काही मात्र कविता म्हणूनच मला जास्त आवडल्या. चाल लावून जरा कृत्रीम झाल्या आहेत असे मला वाटले.
Kavi anil ह्यांची गाणी असलेली तुझ्याविना ही म्युझिक सीडी कोणाकडे आहे का म्युझिक डायरेक्शन आनंद मोडक
Post a Comment