Friday, April 11, 2008

कवि अनिल

कवि अनिल

अचानक धनलाभ तसा कधीकधी अचानक celebrity लाभ होतो. मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाण्याचा मुहूर्त साधला. सूरजकुंड्च्या आलीशान हॉटेल मध्ये रहाण्याची व्यवस्था. प्रशस्त रूम्स. रूम्सच्या मधोमध तळे त्याबाजूला पेंडॉल. रोषणाईची जय्यत तयारी एका बाजूला चालू. मला फ़िकीर मी कोणत्या रूममध्ये आणि माझ्याबरोबर कोणती व्यक्ती येणार? नागपूरच्या माझ्या मित्रांपैकी की कोणि अनोळखी? मग गप्पा कोणाबरोबर मारणार?
मित्राने सांगितले तू काळजी करू नको. आत्ता इकडे तिकडे फ़ीर. संध्याकाळी सांगतो कोण आहे तुझ्याबरोबर. दिवस फ़िरण्यात घालवला. थोडे trinkets घेतले. रात्रीच्या जेवणाआधी मेसेज मिळाला देशपांडे सर तुझ्याबरोबर आहेत. मी आनंदाने उडालोच. म्हणजे कवि"अनिलांचे" चिरंजीव? हो पण त्याचे काय? त्यांची identity तर department of architecture चे head ही होती. अतिशय प्रोफ़ेशनल approach. disciplined व्यक्ती. सगळ्यांना त्यांच्याबद्दल नितांत आदर. architecture चे subjects शिकवावे ते त्यांनीच. खूप काही बोलायचे मनात साठवून मध्यरात्री शिरलो function आटोपून रूममध्ये तर नशिबाने ते जागेच होते.

"सर, मी आज जरी प्रोफ़ेसर असलो तरी बहात्तर ते सत्त्याहत्तर तुम्हाला हेड म्हणून पाहीलेय. तुमच्याशी तेव्हापासूनच बोलायची ईच्छा होती पण शक्य झाले नाही. आज विचारायची ईच्छा आहे की मला तुम्ही कवि "अनिलांचे" चिरंजीव म्हणून सांगा की कवि अनिल केव्हा आणि कशा कविता लिहायचेत?"
"मला खरं तर हे आवडलं की तुम्ही ईतरांप्रमाणे हे नाही विचारले की मी का कवि नाही झालो. माझे बाबा सारखे फ़िरतीवर असायचे खास करून नागपूर ते दिल्ली या रूटवर. त्यांची फ़र्स्टक्लास कोचअमध्ये वरचा बर्थवरची जागा रिझर्व केलेली असायची. रात्री बसलेत बर्थवर की मग कविता लिहायला सुरूवात व्हायची. त्यांच्या बर्याचशा कविता ह्या वरच्या बर्थवरच्याच आहेत. पण success rate 50%. कारण अर्ध्या तरी वेळेस त्यांना ओळखणारा कोणि तरी भेटायचाच. मग कसल्या कविता अन कसलं काय. गप्पांमध्येच वेळ निघून जायचा. पण घरी आल्यावर माझी आई त्यांना विचारायची," किती कविता केल्यात?". मग केली असेल तर कवितावाचन व्हायचे. त्यात करेक्शन्स, मॉडिफ़िकेशन्स वगैरे सोपस्कार होऊन ती पूर्णत्वाला यायची. खासकरून दशपदी हा प्रकार त्यांनी ट्रेनमध्येच जास्तं लिहीला?"

"दशपदीची एखादी खास आठवण?"
"हो. त्यांची शेवटची दशपदी ही नेमकी नऊ ओळिंची होती. त्ती पूर्ण करण्यासाठी तमाम रसिकांना आवाहन केलं. खूप जणांनी response दिला. पण मनासारखी पूर्तता होत नव्हती. शेवटी मान्यवर विजया राजाध्यक्ष यांनी नोट केले की नऊ ओळींमधली शेवटची ओळ मुळी दहावी ओळ होती व नववी ओळ missing होती. त्यानंतर काम सोपे झाले. माझ्या वडिलांना दशपदीत शेवटची ओळ आधी लिहून मग नववी ओळ लिहायची सवय होती. "

"ते हातांनी लिहायचे की typewriter वर लिहायचे घरी?"
" हातांची व खास करून बोटांची एक गंमत आहे. आप्ल्या बोटांची टोके ही फ़ार sensitive असतात. डोक्याशी जर त्यांचे जमले तर बोटेच लिहीतात असे वाटते. पण त्यासाठी डोके, विचार व लेखणी ह्यांचे synchronization व्हायला हवे."
" हा त्याबद्दल परवाच्याच एका संगीत सरिता कार्यक्रमाची आठवन आली. त्यात एका संगीत तद्न्याने सांगितले की प्रथम आम्ही वाजवतो मग विचार करतो की काय वाजवतोय. मग आम्ही विचार करतो की काय वाजवायचे आहे आणि मग दुसर्या stage मध्ये त्याप्रमाणे वाजवतू. पण खरी कसोटी असते ती तिसर्या stage ची की तेव्हा आम्ही बोटांनी वाजवतो विचार आणि वाजवणे एक्साथ होतं. ती खरी परमानंदी टाळी!"

गप्पांमध्ये घड्याळ मध्यरात्रीचे किती वाजलेले दखवतंय इकडे दुर्लक्ष झाले आणि शेवटी एक CD gift मिळाली कवि अनिलांच्या दशपदींची !
सूरतला आल्यावर ऎकताना ब्रह्मानंदी टाळी लागली आणि अर्थापलीकडचे अर्थ एक एक करून पाझरू लागले. बोल होते :

कितीक काळ हालला असा तुझ्याविना
कळॆ न श्वास चालला तुझ्याविना

दुसरी दशपदी :

थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज

पंखी खुपसून चोच
एक पक्षी निजलेला

3 comments:

Nandan said...

anubhav aavadala. kavi anil aani kusumavti deshpandenche chiranjeev mhanaje tyanchyajaval tar anubhavancha motha satha asanar.

Kamini Phadnis Kembhavi said...

हातांची व खास करून बोटांची एक गंमत आहे. आप्ल्या बोटांची टोके ही फ़ार sensitive असतात. डोक्याशी जर त्यांचे जमले तर बोटेच लिहीतात असे वाटते. पण त्यासाठी डोके, विचार व लेखणी ह्यांचे synchronization व्हायला हवे."
" हा त्याबद्दल परवाच्याच एका संगीत सरिता कार्यक्रमाची आठवन आली. त्यात एका संगीत तद्न्याने सांगितले की प्रथम आम्ही वाजवतो मग विचार करतो की काय वाजवतोय. मग आम्ही विचार करतो की काय वाजवायचे आहे आणि मग दुसर्या stage मध्ये त्याप्रमाणे वाजवतू. पण खरी कसोटी असते ती तिसर्या stage ची की तेव्हा आम्ही बोटांनी वाजवतो विचार आणि वाजवणे एक्साथ होतं. ती खरी परमानंदी टाळी!">>>>jhakkaas vaakya aahet hee :)
aapasukach tondatun agadee agadee nighaal. :)aaNakhin kahi dashapadee lihaa naa jamat asel tar.

prasad bokil said...

काका बर्याच दिवसांनी परत बोटे या दिशेला वळली आहेत. छान वाटलं अनुभव वाचून. त्या कवितातील काही दुर्मिळ लवकरच तुमच्या ब्लोग वर बघायला मिळ्तील अशी आशा करतो.