अशोककुमार हा तसा वादातीत नट. त्याचे नाव कुठे कोणाशी जोडलेले फ़ारसे ऎकिवात नाही. पण याच अशोककुमारने स्वत:च्याच एका interview त सांगितले होते की एकदा त्याच्याच बायकोने नको त्या (अती ) संशयाने आपल्याच नवर्यावर, म्हणजे अशोककुमारवर, त्याचे निरूपा रॉयबरोबर लफ़डे आहे असा आरोप केला होता आणि तिला समजावता समजावता त्याच्या नाकी नऊ आले होते. अंबानी बंधूंपैकी एकाची बायको, धीरूभाईची सून, टिना, ही एके काळी, आपल्या लाडक्या(?) संजूबाबाची hot flame होती. रॉकीमध्ये तिला जो ब्रेक मिळाला त्याच्याबरोबर तो संजूबाबामुळेच. पुदे तिने राजेश खन्नाबरोबर life मध्ये break मिळताच, संजूचे हार्ट break केले. ती दोघे जेव्हा खंडाळ्याला एकत्र कारमधून जात होती तेव्हा त्यांच्यामागून संजूबाबाच जात होता, मित्रांनी सांगितलेल्या बातमीवर विश्वास नं बसल्यामुळे चेक करायला.टिना-राजेशचा कारमधला प्रणय पाहून, संजूचे डोळे उघडले ते वारंवार मिटण्यासाठीच. टिना व राजेश यांनी प्रेमाची व्याख्या नवीन केली होती. ते दोघे एकच tooth-brush वापरत होते. तुमचे आमचे प्रेम क्षुल्लक! कारण तुम्ही आम्ही वेगवेगळे ब्रश वापरतो.
पुढे राजेश खन्नाला सोडून तिने अंबानी घराण्याशी घरोबा जोडला, तेव्हा राजेश खन्ना म्हणाला होता, अंजू महेंद्रूला मी सोडले, डिंपल व मी समजून वेगळे झालो, पण टिनाने मला सोडले. circle पूर्णं झाले. फ़िरोझ खान व मारिओ मिरांडा हे एकेकाळी मुंबईत रूम-मेट होते. एका लॉजमध्ये. दोघेही तेव्हा खूप मोठे होण्याची स्वप्ने पाहत होते. दोघेही कफ़ल्लक आणि भणंग(संपत्तीने, टॅलंटने नव्हे), . पण दोघेही दुर्दम्य आशावादी! पुढे दोघेही आपापल्या क्षेत्रात topला पोचलेत.हाच फ़िरोझ खान जेव्हा आपल्याच भावाबरोबर, संजय(ऊर्फ़ अब्बास) खान competition मध्ये acting आणि roles करत होता तेव्हा मुमताज त्यांच्यामध्ये common होती. लग्नं तिने संजयशी केले पण फ़ायदा उचलला फ़िरोझ खानने कुर्बानी मध्ये expose करून. विचार करा स्वत:च्या वहिनीला असा कोणी दिर expose करू शकेल का? पण exactly तशीच कानकोंड्यासारखी हकीकत झाली अनिल कपूरची जेव्हा त्याच्या भावाने, बोनीने, श्रीदेवीशी, अनिलच्या गाजलेल्या नायिकेशी लग्नं केले. अनिल कपूर sensitive म्हणून तो असं बोलला की एकाच घरात मी आणि माझी वहिनी राहतोय जिच्याबरोबर मी hot scenes केलेत मला किती embaraassing वाटतं म्हणून सांगू. खरं तर अनिल कपूर हा कपूर आडनावाला शोभा देत नाही. कारण राज कपूरच्या घराण्यात, हे सर्वं common आहे.
गीता बालीने राज कपूरबरोबर जोडी जमवली screen वर (पहा बावरे नैन) पण प्रत्यक्षात ती शम्मीकपूरची बायको झाली. नीतु सिंग ने पदार्पण केले रणधीर कपूरबरोबर(रिक्षावाला सिनेमात), गाजवला screen शशी कपूरबरोबर(दीवार आणि ईतर काही), ऋषीच्या काकाबरोबर. सून झाली ती ऋषीमुळे! बबिता ही याला अपवाद नहती. तिने शम्मी कपूरबरोबर हिट सिनेमे(तुमसे अच्छा कौन है) दिले आणि settle झाली रणधीरबरोबर. ऋषीने त्याच परंपरेत, screen chemistry जमवली पद्मिनी कोल्हापुरेबरोबर(प्रेमरोग,जमाने को तिखाना है), पण तेव्हा ती चिंपू कपूरबरोबर involved होती आणि पुढे कपूर खानदानाची बहू होता होता वाचली. महान दिर-भावजय, आणि काका -पुतणसून परंपरा आपल्याला राज कपूरने दिली आहे याचे भान आहे का कोणाला?
No comments:
Post a Comment